जय जय लक्षुमिकांता शेषशायी

विष्णूची आरती

देवता: श्री विष्णू

मूळ शब्द

जय जय लक्षुमिकांता शेषशायी नारायणा हो । भक्तजनातें रक्षुनि करिसी तापत्रयहरणा हो ॥धृ॥ आदि अनादि सर्वा विश्वासी तूं निज आधार हो । तुझिया ठायीं कल्पित जाले जगनग चराचर हो ॥ त्रिगुणात्मक होउनिया ब्रह्माविष्णू महेश्वर हो । स्वच्छंदानें करिसि उत्पत्ति स्थितीं आणि संहार हो ॥१॥ युगायुगाचे ठाईं जन्मी येउनि वारंवार हो । मच्छकच्छवराह घेसी सिंहादिक अवतार हो ॥ शरणागत रक्षुनिया करिसी दु:खाचा परिहार हो । दुष्टजनातें दंडुनि हरिसि पृथ्वीचा भूभार हो ॥१॥ भृगजळवत हा सेवुनि लटिका मायावी संसार हो । नाना लीला दावुनि शेवटिं होसी निर्विकार हो । सच्चितसुखघन आत्मा निर्मळ सर्वांचें निजसार हो ॥ नीरंजनगुण गातो नकळे तव स्वरुपाचा पार हो ॥३॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

विष्णू — आरत्या

११ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.