रद्दीकरण व परतावा धोरण

बुकिंग रद्द करणे आणि ऑनलाईन भरलेल्या रकमेच्या परताव्याबद्दल.

ग्राहकाने रद्द केल्यास

  • पूजेच्या तारखेपूर्वी ४८ तासांहून अधिक आधी रद्द केल्यास — भरलेली आगाऊ रक्कम पूर्ण परत.
  • ४८ ते २४ तास आधी — आगाऊ रकमेच्या ५०% परत.
  • २४ तासांपेक्षा कमी वेळ आधी किंवा पुरोहित पोहोचल्यावर — परतावा नाही (पुरोहितांचा वेळ व तयारी लक्षात घेऊन).

आमच्याकडून रद्द झाल्यास

योग्य पुरोहित उपलब्ध न झाल्यास किंवा आमच्या बाजूने बुकिंग रद्द झाल्यास भरलेली संपूर्ण रक्कम परत केली जाते, किंवा तुमच्या संमतीने दुसरे पुरोहित दिले जातात.

तारीख बदल

तारीख बदलायची असल्यास शक्य तितक्या लवकर कळवा; उपलब्धतेनुसार नवीन तारीख दिली जाते.

प्रीमियम कुंडली

पेमेंट निश्चित होऊन काम सुरू होण्यापूर्वी रद्द केल्यास पूर्ण रक्कम परत. कुंडली तयार होण्यास सुरुवात झाल्यावर किंवा PDF दिल्यावर परतावा नाही. आमच्या बाजूने वेळेत (साधारण २४ तास) कुंडली न मिळाल्यास किंवा चुकीची माहिती आमच्याकडून झाल्यास दुरुस्त करून देऊ किंवा पैसे परत करू. कुरिअरमध्ये पार्सल हरवल्यास नवीन प्रत पाठवू.

डिजिटल उत्पादने

ई-पुस्तके व PDF कुंडली पाठवल्यानंतर परत करता येत नाहीत. चुकीची किंवा न उघडणारी फाईल मिळाल्यास आम्ही योग्य फाईल पाठवू.

परतावा कसा मिळतो

मंजूर परतावा ज्या पद्धतीने पेमेंट केले त्याच पद्धतीने (UPI/कार्ड/नेटबँकिंग) ५–७ कामकाजाच्या दिवसांत जमा होतो. रद्दीकरणासाठी बुकिंग आयडीसह info@vedpurohit.com किंवा WhatsApp वर संपर्क करा.

११ ऑक्टोबर २०२६

🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.