साखरपुडा विधी
वाङ्निश्चय — लग्नाच्या आधीचा मंगल विधी
₹२,१०० – ₹५,१००
१.५ ते २ तास
पूजेबद्दल
महाराष्ट्रीय लग्नापूर्वीचा साखरपुडा (वाङ्निश्चय) विधी: गणपती पूजन, दोन्ही कुटुंबांकडून वधू-वरांची ओटी भरणे, साखरेचा पुडा व साडी-कपडे देणे, अंगठी घालणे आणि लग्नाचा निश्चय पुरोहितांच्या साक्षीने केला जातो. हवा असल्यास लग्नाचा मुहूर्तही याच वेळी काढला जातो.
फायदे
- विवाहाचा शुभ निश्चय
- दोन्ही कुटुंबांचे नाते दृढ
- विघ्नरहित लग्नाची तयारी
- देवाचा आशीर्वाद
- लग्न मुहूर्त निश्चिती
पूजा सामग्री
- गणेश मूर्ती / सुपारी
- साखरेचा पुडा
- अंगठ्या
- साडी व कपडे
- ओटीसाठी तांदूळ, नारळ, खण
- हळद-कुंकू, अक्षता
- फुलांचे हार (२)
- पेढे
- विड्याची पाने, सुपारी
- अगरबत्ती, कापूर, दिवा
अंदाजे किंमत₹२,१०० पासून
ही पूजा बुक करा