गोपनीयता धोरण

VedPurohit वेबसाइट व ॲप वापरताना तुमची माहिती आम्ही कशी घेतो, वापरतो, कोणाला देतो व सुरक्षित ठेवतो — याचे हे धोरण.

१. आम्ही कोणती माहिती घेतो

  • खाते: नाव, मोबाईल / ई-मेल, पासवर्ड (फक्त सुरक्षित hash स्वरूपात), आवडती भाषा. Google ने लॉगिन केल्यास Google कडून नाव व ई-मेल.
  • पूजा बुकिंग: पूजेचे नाव, तारीख व वेळ, पूर्ण पत्ता (घर, परिसर, खूण, शहर, पिनकोड), संपर्क, साहित्य कोण आणणार, टीप, कूपन / रेफरल कोड.
  • प्रीमियम कुंडली: नाव, जन्म तारीख, वेळ व ठिकाण (विवाह जुळवणीसाठी मुलगा व मुलगी दोघांचे), प्रश्न, कुरिअरसाठी पत्ता, पेमेंटचा संदर्भ क्रमांक.
  • पुरोहित: प्रोफाइल (फोटो, अनुभव, भाषा, सेवा, सेवा क्षेत्र, परिचय), पूजेचे फोटो, आधार कार्डचे दोन्ही बाजूंचे फोटो (फक्त पडताळणीसाठी), ठिकाण (शहर / पिनकोड किंवा तुम्ही परवानगी दिल्यास एकदाच घेतलेले GPS), स्वतःच्या बुकिंगची नोंद व कमाईची नोंद.
  • साहित्य स्टोअर, रत्न, ई-पुस्तके, सदस्यता: नाव, संपर्क, पत्ता व ऑर्डरचा तपशील.
  • रिव्ह्यू व रेटिंग, WhatsApp / सूचनांमधून झालेला संवाद.
  • ॲप: फोनवर ठेवलेली माहिती (पंचांग, ग्रंथालय, जतन केलेल्या कुंडली, नाम जप) तुमच्या फोनवरच राहते. नोटिफिकेशनसाठी आवश्यक तांत्रिक माहिती.
  • तांत्रिक: लॉगिन व भाषा लक्षात ठेवण्यासाठी आवश्यक cookies; सुरक्षिततेसाठी IP व लॉगिन प्रयत्नांची नोंद. जाहिरातीसाठी ट्रॅकिंग आम्ही करत नाही.

२. माहितीचा वापर

  • तुमची बुकिंग, ऑर्डर किंवा कुंडली पूर्ण करणे व त्याची स्थिती कळवणे (ॲप / वेबसाइट सूचना, SMS / WhatsApp).
  • जवळचे व योग्य पुरोहित शोधणे — पत्त्यावरून अंदाजे ठिकाण काढून जवळच्या पुरोहितांना विनंती दाखवणे.
  • पुरोहितांची ओळख व प्रोफाइल पडताळणे (आधार), फसवणूक रोखणे.
  • रेफरल पॉइंट, वॉलेट व पेमेंटचा हिशेब ठेवणे.
  • सेवा सुधारणे व मदत करणे.

३. कोणाला काय दिसते

  • पुरोहितांना: विनंती स्वीकारण्यापूर्वी फक्त पूजा, तारीख, परिसर व तुमचे पहिले नाव; बुकिंग निश्चित झाल्यावरच पूर्ण नाव, मोबाईल व पत्ता.
  • ग्राहकांना: पुरोहितांचे सार्वजनिक प्रोफाइल (लॉगिन केल्यावर). फोन नंबर फक्त प्रीमियम पुरोहितांनी परवानगी दिल्यास; अन्यथा संपर्क VedPurohit मार्फत.
  • आधार कार्डचे फोटो सार्वजनिक फोल्डरमध्ये ठेवले जात नाहीत — ते फक्त VedPurohit टीम पडताळणीसाठी पाहते, ग्राहकांना कधीच दिसत नाहीत.
  • प्रीमियम कुंडलीची PDF फक्त तुमच्या खात्यातून, थोड्या वेळापुरत्या सुरक्षित लिंकने डाउनलोड होते.

४. माहिती कोणाला दिली जाते

आम्ही तुमची माहिती विकत नाही. सेवा देण्यासाठी आवश्यक तेवढीच माहिती: ऑनलाईन पेमेंटसाठी Razorpay (कार्ड / UPI तपशील आमच्याकडे साठवले जात नाहीत), कुरिअरसाठी कुरिअर कंपनी (नाव, पत्ता, फोन), लॉगिनसाठी Google (तुम्ही निवडल्यास), ठिकाण शोधण्यासाठी OpenStreetMap (फक्त पत्ता / पिनकोड). WhatsApp वर संवाद केल्यास WhatsApp चे धोरण लागू होते. कायद्याने आवश्यक असल्यासच अधिकृत संस्थांना माहिती दिली जाते.

५. सुरक्षितता व कालावधी

माहिती सुरक्षित (HTTPS) सर्व्हरवर ठेवली जाते; पासवर्ड कधीही साध्या स्वरूपात नसतात; आधार व कुंडली PDF खासगी फोल्डरमध्ये. बुकिंग व पेमेंटची नोंद कायदेशीर व हिशेबाच्या गरजेपुरती ठेवली जाते; खाते काढून टाकल्यावर बाकी वैयक्तिक माहिती काढली किंवा अनामिक केली जाते.

६. तुमचे अधिकार

  • खात्यातून तुमची माहिती पाहणे व बदलणे (नाव, संपर्क, पत्ता, भाषा, पासवर्ड).
  • सूचना / नोटिफिकेशन बंद करणे (ॲप सेटिंग्ज).
  • खाते व माहिती काढून टाकण्याची विनंती: info@vedpurohit.com किंवा WhatsApp +91 8796509552 वर नोंदणीकृत मोबाईलसह कळवा.

७. मुले

VedPurohit १८ वर्षांखालील व्यक्तींसाठी खाते देत नाही. मुलांची माहिती (उदा. नामकरण, कुंडली) पालकच देतात.

८. बदल व संपर्क

हे धोरण वेळोवेळी बदलू शकते; मोठ्या बदलांची सूचना वेबसाइट / ॲपवर दिली जाईल. प्रश्नांसाठी: info@vedpurohit.com · +91 8796509552 · vedpurohit.com

११ ऑक्टोबर २०२६

🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.