मारुती स्तोत्र (भीमरूपी)

भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती — समर्थ रामदासकृत

देवता: श्री हनुमान

मूळ शब्द

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती । वनारि अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥ १ ॥ महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें । सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका ॥ २ ॥ दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदांतरा । पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥ ३ ॥ लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥ ४ ॥ ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें । काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥ ५ ॥ ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवळे दंतपंगती । नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा भ्रकुटी तठिल्या बळें ॥ ६ ॥ पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं । सुवर्णकटिकांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥ ७ ॥ ठकारे पर्वताऐसा नेटका सडपातळू । चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥ ८ ॥ कोटिच्या कोटि उड्डणें झेपावे उत्तरेकडे । मंदाद्रीसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥ ९ ॥ आणिला मागुती नेला आला गेला मनोगती । मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे ॥ १० ॥ अणूपासोनि ब्रह्मांडायेवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठें मेरुमांदार धाकुटें ॥ ११ ॥ ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके । तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥ १२ ॥ आरक्त देखिलें डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥ १३ ॥ धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही । पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां ॥ १४ ॥ भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही । नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शनें ॥ १५ ॥ हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली भली । दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकलागुणें ॥ १६ ॥ रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू । रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ॥ १७ ॥ ॥ इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम श्री मारुतिस्तोत्रम् संपूर्णम् ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

राम व हनुमान — स्तोत्रे

५ स्तोत्रे
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.