१. सेवा
VedPurohit ग्राहकांना स्वतंत्र, पडताळणी केलेल्या पुरोहितांशी जोडणारे व्यासपीठ आहे. पूजा प्रत्यक्ष पुरोहित करतात; आम्ही बुकिंग, समन्वय, साहित्य, कुंडली व माहिती सेवा देतो. पंचांग, ग्रंथालय, मोफत कुंडली इत्यादी साधनेही देतो.
२. खाते
- खाते तयार करताना खरी माहिती द्या; पासवर्ड गोपनीय ठेवा. तुमच्या खात्यातून झालेल्या कृतींची जबाबदारी तुमची.
- खाते तयार करताना तुम्ही ग्राहक की पुरोहित ते निवडता; एका मोबाईल / ई-मेलचे एकाच प्रकारचे खाते.
- नियमांचे उल्लंघन, फसवणूक किंवा गैरवर्तन झाल्यास VedPurohit खाते बंद करू शकते.
३. पूजा बुकिंग
- वेबसाइट / ॲपवरील किंमत ही अंदाजे श्रेणी आहे; अंतिम दक्षिणा पूजा, साहित्य, अंतर व कालावधीनुसार ठरते.
- बुकिंग पुरोहित निश्चित झाल्यावरच पक्की होते. पुरोहित न निवडल्यास आमची टीम जवळचे योग्य पुरोहित देते; पुरोहितांनी “तयार” कळवल्यावर टीम खात्री करून निश्चित करते.
- विशिष्ट पुरोहित निवडून बुकिंग करण्यासाठी खाते आवश्यक आहे.
- तारीख बदल किंवा रद्दीकरण पूजेच्या दिवसापूर्वी ॲप / वेबसाइटवरून करता येते (मर्यादेत). परतावा रद्दीकरण धोरणानुसार.
४. ग्राहकाची जबाबदारी
- योग्य नाव, संपर्क व पूर्ण पत्ता देणे
- पूजेसाठी जागा व (ठरल्याप्रमाणे) साहित्याची व्यवस्था
- पुरोहितांशी सन्मानाने वागणे; बदल शक्य तितक्या लवकर कळवणे
५. पुरोहितांसाठी
- खाते उघडल्यावर प्रोफाइल व आधार पडताळणीसाठी पाठवा; आमची टीम साधारण २४–४८ तासांत तपासून मंजूर करते. मंजुरीपर्यंत प्रोफाइल शोध / यादीत दिसत नाही व बुकिंग मिळत नाहीत.
- खरी माहिती, खरे फोटो; स्वीकारलेल्या बुकिंगसाठी वेळेवर उपस्थिती; ग्राहकांची माहिती फक्त त्या पूजेसाठी वापरणे.
- ऑफलाइन असताना नवीन बुकिंग येत नाहीत; उपलब्ध नसलेल्या तारखा बंद करा.
- रेफरल पॉइंट फक्त खऱ्या, संपन्न झालेल्या व्यवहारांवर मिळतात; स्वतःच्या बुकिंग / ऑर्डरवर नाहीत. गैरवापर दिसल्यास पॉइंट रद्द होऊ शकतात.
६. प्रीमियम कुंडली
- खाते आवश्यक. पेमेंट (ऑनलाइन किंवा UPI) मिळाल्याची टीमने खात्री केल्यावरच काम सुरू होते; साधारण २४ तासांत PDF खात्यात मिळते.
- विवाह जुळवणीसाठी मुलगा व मुलगी दोघांचे अचूक जन्म तपशील द्या; चुकीच्या माहितीची जबाबदारी आमची नाही.
- छापील प्रत कुरिअरने पाठवली जाते; ट्रॅकिंग क्रमांक ॲप / वेबसाइटवर दिसतो. कुरिअरचा कालावधी कंपनीवर अवलंबून.
७. पेमेंट, स्टोअर व रत्ने
ऑनलाइन पेमेंट Razorpay मार्फत सुरक्षित होते. साहित्य / रत्न ऑर्डर व रत्नांबद्दलची माहिती मार्गदर्शनासाठी आहे. परतावा व रद्दीकरण — रद्दीकरण व परतावा धोरण पाहा.
८. रिव्ह्यू व मजकूर
रिव्ह्यू फक्त संपन्न बुकिंगनंतर देता येतात. खोटा, आक्षेपार्ह किंवा वैयक्तिक माहिती असलेला मजकूर काढून टाकण्याचा अधिकार VedPurohit कडे आहे. पुरोहितांनी टाकलेले फोटो त्यांचे स्वतःचे असावेत.
९. संवाद
बुकिंग, ऑर्डर व खात्याबद्दल आम्ही ॲप / वेबसाइट सूचना, SMS किंवा WhatsApp वर संदेश पाठवू शकतो. सूचना ॲप सेटिंग्जमधून बंद करता येतात.
१०. मर्यादा
पंचांग, मुहूर्त, कुंडली व ज्योतिषविषयक माहिती पारंपरिक मार्गदर्शनासाठी आहे; महत्त्वाचे निर्णय घेताना तज्ञांचा सल्ला घ्यावा. पुरोहितांच्या वैयक्तिक कृतींची जबाबदारी त्यांची; तक्रार आल्यास आम्ही योग्य कारवाई करतो.
११. कायदा व संपर्क
या अटी भारतीय कायद्यानुसार आहेत; वाद महाराष्ट्रातील न्यायालयांच्या अखत्यारीत. अटी आवश्यकतेनुसार बदलू शकतात. प्रश्न / तक्रारीसाठी: info@vedpurohit.com · +91 8796509552
११ ऑक्टोबर २०२६