श्री गणपतीची आरती
सुखकर्ता दुःखहर्ता — समर्थ रामदास
मूळ शब्द
अर्थ
समर्थ रामदास स्वामींनी रचलेली ही आरती प्रत्येक पूजेत आणि गणेशोत्सवात सर्वांत आधी म्हटली जाते.
१. गणपती सुख देणारा आणि दुःख हरण करणारा आहे; त्याच्या कृपेने विघ्नांची वार्ताही उरत नाही. तो भक्तांना भरभरून प्रेम देतो. त्याच्या सर्वांगाला शेंदुराची सुंदर उटी लावलेली आहे आणि गळ्यात मोत्यांची माळ झळकते.
धृपद: हे मंगलमूर्ती, तुझा जयजयकार असो. तुझ्या केवळ दर्शनाने मनातील इच्छा पूर्ण होतात.
२. हे गौरीपुत्रा, तुला रत्नजडित फरा (अलंकार) शोभतो. चंदन, कुंकू आणि केशराची उटी लावली आहे, हिरेजडित मुकुट शोभतो आणि पायांतील नूपुरे-घुंगरू रुणझुण वाजतात.
३. मोठे पोट, पिवळा पीतांबर, कमरेला नागाचा बंध, सरळ सोंड, वक्रतुंड आणि तीन नेत्र असलेल्या देवा — हा रामाचा दास घरी तुझी वाट पाहत आहे. हे देववंदित गणेशा, संकटात धावून ये आणि अंतकाळी रक्षण कर.
पूजा बुक करायची आहे?
अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.