लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।
लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ धृ. ॥
कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।
विभूतीचे उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ २ ॥
जय देव जय देव ॥
देवी दैत्यी सागरमंथन पै केले ।
त्यामाजी अवचित हलाहल जे उठिले ।
ते त्वां असुरपणे प्राशन केले ।
नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ ३ ॥
जय देव जय देव ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरी ॥ ४ ॥
जय देव जय देव ॥
Lavathavati Vikrala Brahmandi Mala,
Vishe Kanth Kala Trinetri Jvala.
Lavanyasundar Mastaki Bala,
Tethuniya Jal Nirmal Vahe Zulzula. ॥ 1 ॥
Jay Dev Jay Dev Jay Shri Shankara,
Aarti Ovalu Tuj Karpuragaura. ॥ Refrain ॥
Karpuragaura Bhola Nayani Vishala,
Ardhangi Parvati Sumananchya Mala.
Vibhutiche Udhalan Shitikanth Nila,
Aisa Shankar Shobhe Umavelhala. ॥ 2 ॥
Jay Dev Jay Dev ॥
Devi Daityi Sagaramanthan Pai Kele,
Tyamaji Avachit Halahal Je Uthile.
Te Tvan Asurapane Prashan Kele,
Nilakanth Nam Prasiddha Zale. ॥ 3 ॥
Jay Dev Jay Dev ॥
Vyaghrambar Phanivaradhar Sundar Madanari,
Panchanan Manamohan Munijanasukhakari.
Shatakotiche Bij Vache Uchchari,
Raghukulatilak Ramdasa Antari. ॥ 4 ॥
Jay Dev Jay Dev ॥
अर्थ
समर्थ रामदास स्वामींची ही आरती श्रावणी सोमवार, महाशिवरात्री आणि शंकराच्या प्रत्येक पूजेत म्हटली जाते.
१. ज्याच्या गळ्यात ब्रह्मांडाची (मुंडांची) माळ डोलते, विषामुळे ज्याचा कंठ काळा झाला आहे आणि तिसऱ्या नेत्रात ज्वाळा आहेत; ज्याच्या मस्तकावर सुंदर गंगा आहे आणि तिथून निर्मळ पाणी झुळझुळ वाहते — असा शंकर.
धृपद: हे कापरासारख्या गोऱ्या शंकरा, तुझा जयजयकार असो; आम्ही तुला आरती ओवाळतो.
२. तो कापरासारखा गोरा, भोळा आणि विशाल नेत्रांचा आहे. अर्ध्या अंगात पार्वती आहे, गळ्यात फुलांच्या माळा आहेत, अंगावर विभूती उधळलेली आहे आणि कंठ निळा आहे — असा उमेवर प्रेम करणारा शंकर शोभतो.
३. देव आणि दैत्यांनी समुद्रमंथन केले तेव्हा अचानक हलाहल विष निघाले. ते तू (जगासाठी) प्राशन केलेस, म्हणून तुझे नीलकंठ हे नाव प्रसिद्ध झाले.
४. वाघाचे कातडे नेसलेला, नाग धारण करणारा, मदनाचा (कामाचा) नाश करणारा, पाच मुखांचा, मन मोहून टाकणारा आणि मुनींना सुख देणारा शंकर — शतकोटी रामनामाचे बीज मुखाने उच्चारतो. रामदास म्हणतात, रघुकुळाचा भूषण श्रीराम माझ्या अंतरात आहे.