पंचायतन आरती

अघसंकटभयनाशन

देवता: श्री गणेश

मूळ शब्द

अघसंकटभयनाशन सुखदा विग्धेशा । आद्या सुरवरवंद्या नरवारण वेशा ॥ पाशांकुशधर सुंदर पुरवीसी आशा । निजवर देऊनि हरिसी भ्रांतीच्या पाशा ॥ ॥ १॥ जय देव जय देव जय सुखकर मूर्ती । गणपति हरी शिवभास्कर अंबा सुखमूर्ती ॥ धृ ॥ पयसागरजाकांता धरणीधरशयना । करुणालय वारिसि भववारिजदलनयना ॥ गरुडध्वज भजन प्रिय पीतप्रभवसना । अनुदिनिं तव कीर्तनरस चाखो हे रसना ॥ जय ॥ २॥ नंदीवहना गहना पार्वतिच्या रमणा । मन्मथदहना शंभो वातातमजनयना ॥ सर्वोपाय विवर्जित तापत्रयशमना । कैलासाचलवासा करिसी सुरनमना ॥ जय ॥ ३॥ पद्मबोधकरणा नेत्रभ्रमहरणा । गोधन बंधनहरता द्योतक आचरणा ॥ किरण स्पर्शें वारिसि या तम आवरणा । शरणागत भयनाशन सुखवर्धनकरणा ॥ जय ॥ ४॥ त्रिभुवनौत्पति पालन करिसीइ तूं माया । नाहीं तुझिया रूपा दुसरी उपमा या ॥ तुझा गुणगणमहिमा न कळे निगमा या । करुणा करिसी अंबे मनविश्रामा ॥ जय ॥ ५॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

गणपती — आरत्या

७ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.