ऐकोनी कृष्णकीर्ती मन तेथें वेधलें
देवता: श्री कृष्ण
मूळ शब्द
ऐकोनी कृष्णकीर्ती मन तेथें वेधलें ।
सगुणरूप माये माझ्या जीवीं बैसलें ।
तें मज आवडतें अनुमान न बोले ।
पाहावया रूप याचें उतावीळ हो झालें ॥ १॥
यालागीं आरती हो कृष्णा पाही हो सखी ।
आणिक नावडे हो दुजे तिहीं हो लोकीं ॥ धृ॥
पाऊल कृष्णजीचें माझ्या जीवीं बैसलें ।
सनकादिक पाहा महा आसक्त झाले ।
मुक्त जो शुकमुनी तेणें मनीं धरिलें ।
तें मी केवीं सोडूं मज बहू रुचलें ॥ २॥
निर्गुण गोष्टि माये मज नावडे साचें ।
सगुण बोल कांहीं केव्हां आठवी वाचें ।
पाया लागेन तूझ्या हेंचि आर्त मनींचें ।
तेणें घडेल दास्य रमावल्लभाचें ॥ ३॥
पूजा बुक करायची आहे?
अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.