अवतार गोकुळी हो जन तारावयासी

देवता: श्री कृष्ण

मूळ शब्द

अवतार गोकुळी हो । जन तारावयासी ॥ लावण्यरुपडे हो ॥ तेज:पुंजाळ राशी ॥ उगवले कोटिबिंब ॥ रवि लोपला शशी ॥ उत्साह सुरवरां ॥ महाथोर मानसी ॥ १ ॥ जय देवा कृष्णनाथा । राईरखुमाई कांता । आरती ओवाळीन । तुम्हां देवकीसुता ॥ धृ. ॥ कौतुक पहावया ॥ भाव ब्रह्मयाने केली । वत्सेंही चोरुनियां सत्यलोकासी नेलीं गोपाल गाईवत्सें । दोन्ही ठायी रक्षिलि । सुखाचा प्रेमसिंधु । अनाथांची माउली ॥ २ ॥ चारितां गोधनें हो । इंद्र कोपला भारी मेघ कडाडीला ॥ शिला वर्षल्या धारी । रक्षिले गोकुळ हो । नखिं धरिला गिरी । निर्भय लोकपाळ अवतरला हरि ॥ ३ ॥ वसुदेव देवकीचे । बंद फोडीली शाळा । होउनिया विश्वजनिता । तया पोटिंचा बाल । दैत्य हे त्रासियेले । समुळ कंसासी काळ । राज्य हें उग्रेसेना । केला मथुरापाळ ॥ ४ ॥ तारिले भक्तजन । दैत्य सर्व निर्दाळुन । पांडवा साहाकारी । अडलिया निर्वाणी । गुण मी काय वर्णु । मति केवढी वानूं । विनवितो दास तुका । ठाव मागे चरणी ॥ ५ ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

कृष्ण — आरत्या

६ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.