जय देव जय देव जय अंजनितनया

देवता: श्री हनुमान

मूळ शब्द

जयदेव जयदेव जय अंजनितनया ॥ आरति बोवाळूं तुज करुणानि लया ॥ध्रु०॥ अभिवन प्रतापमहिमा न बोलवे वाणी ॥ फळ म्हणवुनियां धरिला बाळपणीं तरणी ॥ अहिरावण महिरावण मारुनिया दोनी ॥ आणिला रघुविर केली अघटित हे करणी ॥१॥ शत योजन एका उडुअणें उदधी ॥ लंघुनि क्रौंचा वधिलें अगणीत बळबुद्धी ॥ लंकाप्रवेश करुनी दशमुख अतिक्रोधी ॥ राक्षस गांजुनि केली त्वां सीताशुद्धी ॥२॥ अशोकवन विध्वंसुनि वनचर निर्दळिले ॥ लंका जाळुनि पुच्छें रजनीचर छळिले ॥ श्रीरामासह सैन्य कपिगण तोषविले ॥ म्हणती भीम पराक्रम हनुमंतें केले ॥३॥ रामानुजसह सेने शक्ती लागतां ॥ द्रोणागिरि आणिला तो रवि-उदय नव्हतां ॥ अमृतसंजीवनी देउनियां त्वरितां ॥ संतोषविले दशरथसुतमहिजा-कांता ॥४॥ महारुद्रा हनुमंता देवा बलभीमा ॥ प्रियकर दास्यत्वें तूं होसी श्रीरामा ॥ शिव शंकर अवतारी निस्सीम सीमा ॥ नि:संगा निजरंगा मुनिमनविश्रामा ॥५॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

मारुती — आरत्या

५ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.