जय श्रीअनंता लक्ष्मीकांता
अनंताची आरती
देवता: श्री अनंत
मूळ शब्द
जय श्रीअनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू ।
भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू ॥ धृ ॥
भाद्रपदमासी शुक्ल चतुर्दशी तव व्रत नेमाने ।
दुकूलदोरक करुनि पूजिति अनंत नामानें ॥ १॥
नानापरिची पुष्पें द्रव्ये तुजला अर्पीती ।
षोडशपूजा करूनी द्वाह्यण संतर्पण करिती ॥ २॥
अपूप वायान दंपतिपूजन त्या दिवशी करिती ।
अनंत सन्तुष्टोनि देती संतति संपत्ती ॥ ३॥
रामा धर्मे आचरीतां व्रत क्लेशांतुनि सुटला ।
कौंडिण्याने पुजितां तुजला उद्धरिले त्याला ॥ ४॥
मोरेश्वरसुत वासुदेव हा तिष्ठत सेवेसी ।
संकटकाळी रक्षी अनंता आपुल्या दासासी ॥ ५॥
पूजा बुक करायची आहे?
अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.