पसायदान
आतां विश्वात्मकें देवें
देवता: संत ज्ञानेश्वर
मूल पाठ
पवित्र पाठ मूल भाषा में ही दिया गया है।
आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे ।
तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ॥
जे खळांचि व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो ।
भूता परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ।
जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूता ॥
चला कल्पतरुंचे अरव । चेतना चिंतामणीचे गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होउनि तिहीं लोकी ।
भजीजो आदिपुरुखी । अखंडित ॥
येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो । हा होईल दान पसावो ।
येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥
पूजा बुक करनी है?
अनुभवी, सत्यापित पंडित पूर्ण वैदिक विधि से पूजा करेंगे।