ही वेबसाइट मराठी मध्ये पाहायची? होय, बदला

श्री व्यंकटेश स्तोत्र (मराठी)

ॐ नमो जी विघ्नहरा — संत देवीदास रचित

देवता: श्री व्यंकटेश

मूल पाठ

पवित्र पाठ मूल भाषा में ही दिया गया है।

श्री गणेशाय नमः ॥ श्री व्येंकटेशाय नमः ॥ ॐ नमो जी हेरंबा । सकळादि तूं प्रारंभा । आठवूनि तुझी स्वरूपशोभा । वन्दन भावें करीतसें ॥ १ ॥ नमन माझें हंसवाहिनी । वाग्वरदे विलासिनी । ग्रंथ वदावया निरूपणीं । भावार्थखाणी जयामाजी ॥ २ ॥ नमन माझें गुरुवर्या । प्रकाशरूपा तूं स्वामिया । स्फूर्ति द्यावी ग्रंथ वदावया । जेणें श्रोतया सुख वाटे ॥ ३ ॥ नमन माझें संत सज्जनां । आणि योगियां मुनिजनां। सकळ श्रोतया साधुजनां । नमन माझें साष्टांगीं ॥ ४ ॥ ग्रंथ ऐका प्रार्थनाशतक । महादोषांसी दाहक । तोषूनियां वैकुंठनायक । मनोरथ पूर्ण करील ॥ ५ ॥ जयजयाजी व्यंकटरमणा । दयासागरा परिपूर्णा । परंज्योति प्रकाशगहना । करितों प्रार्थना श्रवण कीजे ॥ ६ ॥ जननपरी त्वां पाळिलें । पितयापरी त्वां सांभाळिलें । सकळ संकटापासूनि रक्षिलें । पूर्ण दिधलें प्रेमसुख ॥ ७ ॥ हे अलौकिक जरी मानावें । तरी जग हें सृजिलें आघवें । जनक-जननीपण स्वभावें । सहज आलें अंगासी ॥ ८ ॥ दीननाथा प्रेमासाठीं । भक्त रक्षिले संकटीं । प्रेम दिधलें अपूर्व गोष्टी । भजनासाठीं भक्तांच्या ॥ ९ ॥ आतां परिसावी विज्ञापना । कृपाळुवा लक्ष्मीरमणा। मज घालोनि गर्भाधाना । अलौकिक रचना दाखविली ॥ १० ॥ कृपाळुवा जगजेठी । अपराध पोटीं घालीं माझे ॥ ११ ॥ माझिया अपराधांच्या राशी । भेदोनि गेल्या गगनासी । दयावंत हृषीकेशी । आपुल्या ब्रीदासी सत्य करीं ॥ १२ ॥ पुत्राचे सहस्त्र अपराध । माता काय मानी तयाचा खेद । तेवीं तूं कृपाळू गोविन्द । मायबाप मजलागीं ॥ १३ ॥ उडदांमाजी काळेंगोरे । काय निवडावें निवडणारे । कुचलिया वृक्षांची फळें । मधुर कोठोनि असतील ॥ १४ ॥ अराटीलागीं मृदुता । कोठोनि असेल कृपावंता । पाषाणासी गुल्मलता । कैशियापरी फुटतील ॥ १५ ॥ आपादमस्तकावरी अन्यायी । परी तुझे पदरीं पडिलों पाहीं । आतां रक्षण नाअना उपायीं । करणें तुज उचित ॥ १६ ॥ समर्थाचे घरीचें श्वान । त्यासी सर्वही देती मान । तैसा तुझा म्हणवितों दीन । हा अपमान कवणाचा ॥ १७ ॥ लक्ष्मी तुझे पायांतळीं । आम्ही भिक्षेसी घालोनि झोळी । येणें तुझी ब्रीदावळी । कैसी राहील गोविन्दा ॥ १८ ॥ कुबेर तुझा भांडारी । आम्हां फिरविसी दारोदारीं । यांत पुरुषार्थ मुरारी । काय तुजला पैं आला ॥ १९ ॥ द्रौपदीसी वस्त्रें अनंता । देत होतासी भाग्यवंता । आम्हांलागीं कृपणता । कोठोनि आणिली गोविन्दा ॥ २० ॥ मावेची करोनि द्रौपदी सती । अन्नें पुरविलीं मध्यरातीं । ॠषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती । तृप्त केल्या क्षणमात्रें ॥ २१ ॥ अन्नासाठीं दाही दिशा । आम्हां फिरविशी जगदीशा । कृपाळुवा परमपुरुषा । करुणा कैसी तुज न ये ॥ २२ ॥ अंगिकारी या शिरोमणि । तुज प्रार्थितों मधुर वचनीं । अंगिकार केलिया झणीं । मज हातींचे न सोडावें ॥ २३ ॥ समुद्रें अंगिकारिला वडवानळ । तेणें अंतरीं होतसे विव्हळ । ऐसें असोनि सर्वकाळ । अंतरी सांठविला तयानें ॥ २४ ॥ कूर्में पृथ्वीचा घेतला भार । तेणें सोडिला नाहीं बडिवार । एवढा ब्रह्मांडगोळ थोर । त्याचा अंगिकार पैं केला ॥ २५ ॥ शंकरे धरीलें हाळाहळा । तेणें नीळवर्ण झाला गळा । परी त्यागिलें नाहीं गोपाळा । भक्तवत्सला गोविन्दा ॥ २६ ॥ माझ्या अपराधांच्या परी । वर्णिता शिणली वैखरी । दुष्ट पतित दुराचारी । अधमाहूनि अधम ॥ २७ ॥ विषयासक्त मन्दमति आळशी । कृपण कुव्यसनी मलिन मानसीं । सदा सर्वकाळ सज्जनांशी । द्रोह करी सर्वदा ॥ २८ ॥ वचनोक्ति नाहीं मधुर । अत्यंत जनांसीं निष्ठुर। सकळ पामरांमाजी पामर । व्यर्थ बडिवार जगीं वाजे ॥ २९ ॥ काम क्रोध मद मत्सर । हें शरीर त्यांचे बिडार । कामकल्पनेसी थार। दृढ येथें केला असे ॥ ३० ॥ अठरा भार वनस्पतींची लेखणी । समुद्र भरला मषीकरुनी । माझें अवगुण लिहितां धरणी । तरी लिहिले न जाती ॥ ३१ ॥ ऐसा पतित मी खरा । परि तूं पतितपावन शार्ङधरा । तुवां अंगिकार केलिया गदाधरा । कोण दोषगुण गणील ॥ ३२ ॥ नीच रतली रायाशीं । तिसी कोण म्हणेल दासी । लोह लागतां परिसासी । पूर्वस्थिति मग कैंची ॥ ३३ ॥ गांवींचे होते लेंडवोहळ । गंगेसी मिळतां गंगाजळ । कागविष्ठेचे झाले पिंपळ । तयांसी निन्द्य कोण म्हणें ॥ ३४ ॥ तसा कुजाति मी अमंगळ । परी तुझा म्हणवितो केवळ । जाणत असता अपराधी नर । तरी कां केला अंगीकार । अंगीकारावरी अव्हेर । समर्थें न केला पाहिजे ॥ ३६ ॥ धांव पाव रे गोविन्दा । हातीं घेवोनियां गदा । करीं माझ्या कर्मांचा , चेन्दा । सच्चिदानंदा श्रीहरी ॥ ३७ ॥ तुझिया नामाचि अपरिमित शक्ति । तेथें माझीं पापें किती । कृपाळूवा लक्ष्मीपती । बरवें चित्तीं विचारीं ॥ ३८ ॥ तुझें नाम पतितपावन । तुझें नाम कलिमलदहन । तुझें नाम भवतारण । संकटनाशन नाम तुझें ॥ ३९ ॥ आतां प्रार्थना ऐकें कमळापती । तुझें नामी राहों माझी मती । हेंचि मागतों पुढतपुढती । परंज्योति व्यंकटेशा ॥ ४० ॥ तूं अनंत तुझीं अनंत नामे । तयांमाजी अति सुगमें । ती मी अल्पमति प्रेमें । स्मरुनि प्रार्थना करीतसें ॥ ४१ ॥ श्रीव्यंकटेशा वासुदेवा । प्रद्युम्ना अनंता केशवा । संकर्षणा श्रीधरा माधवा । नारायणा आदिमूर्तें ॥ ४२ ॥ पद्मनाभा दामोदरा । प्रकाशगहना परात्परा । कृष्णा विष्णो हृषीकेशा । अनिरुध्दा पुरुषोत्तमा परेशा । नृसिंह वामन भार्गवेशा । बौध्द कलंकी निजमूर्ती ॥ ४४ ॥ अनाथरक्षका आदिपुरुषा । पुर्णब्रह्म सनातन निर्दोषा । सकळ मंगळ मंगळाधीशा । सज्जनजीवना सुखमूर्ते ॥ ४५ ॥ गुणातीता गुणज्ञा । निजबोधरूपा निमग्ना । शुद्ध सात्विका सुज्ञा । गुणप्राज्ञा परमेश्वरा ॥ ४६ ॥ श्रीनिधि श्रीवत्सलांछन धरा । भयकृद्भयनाशना गिरिधरा । दुष्टदैत्यसंहारकरा । वीरा सुखकरा तूं एक ॥ ४७ ॥ निखिल निरंजन निर्विकारा । विवेकखाणी-वैरागरा । मधुमुरदैत्यसंहारकरा । असुरमर्दना उग्रमूर्ते ॥ ४८ ॥ शंखचक्रगदाधरा । गरुडवाहना भक्तप्रियकरा । गोपीमनरंजना सुखकरा । अखंडित स्वभावे ॥ ४९ ॥ नानानाटक-सुत्रधारिया । जगद्व्यापका जगद्वर्या । कृपासमुद्रा करुणालया । मुनिजनध्येया मूळमुर्ती ॥ ५० ॥ शेषशयना सार्वभौमा । वैकुंठवासिया निरुपमा । भक्तकैवारिया गुणधामा । पाव आम्हां ये समयीं ॥ ५१ ॥ ऐसी प्रार्थना करूनि देवीदास । अंतरी आठविला श्रीव्यंकटेश । स्मरतां हृदयीं प्रकटला ईश । त्या सुखासी पार नाहीं ॥ ५२ ॥ हृदयीं आविर्भवली मूर्ति । त्या सुखाची अलौकिक स्थिती । आपुले आपण श्रीपती । वाचेहातीं वदवीतसे ॥ ५३ ॥ तें स्वरूप अत्यंत सुन्दर । श्रोती श्रवण कीजे सादर । सांवळी तनु सुकुमार । कुंकुमाकार पादपद्में ॥ ५४ ॥ सुरेख सरळ अंगोळिका । नखें जैसी चन्द्ररेखा । घोटींव सुनीळ अपूर्व देखा । इन्द्रनीळाचियेपरी ॥ ५५ ॥ चरणीं वाळे घागरिया । वांकी वरत्या गुजरिया । सरळ सुन्दर पोटरिया । कर्दळीस्तंभाचियेपरी ॥ ५६ ॥ गुडघे मांडीया जानुस्थळ । कटितटी किंकिणी विशाळ । कटीवरतें नाभिस्थान । जेथोनि ब्रह्मा उत्पन्न । उदरी त्रिवळी शोभे गहन । त्रैलोक्य संपूर्ण जयामाजी ॥ ५८ ॥ वक्षःस्थळीं शोभे पदक । पाहोनि चन्द्रमा अधोमुख । वैजयंती करी लखलख । विद्युल्लतेचियेपरी ॥ ५९ ॥ हृदयीं श्रीवत्सलांछन । भूषण मिरवी श्रीभगवान । तयावरतें कंठस्थान । जयासी मुनिजन अवलोकिती ॥ ६० ॥ उभय बाहुदंड सरळ । नखे चन्द्रापरीस तेजाळ । शोभती दोन्ही करकमळ । रातोत्पलाचियेपरी ॥ ६१ ॥ मनगटीं विराजती कंकणें । बाहुवटीं बाहुभूषणें । कंठावरुतें मुखकमळ । हनुवटी अत्यंत सुनीळ । मुखचन्द्रमा अति निर्मळ । भक्तस्नेहाळ गोविंदा ॥ ६३ ॥ दोन्ही अधरांमाजी दंतपंक्ती । जिव्हा जैसी लावण्यज्योती । अधरामृतप्राप्तीची गती । तें सुख जाणे लक्ष्मी ॥ ६४ ॥ सरळ सुन्दर नासिक । जेथें पवनासी झालें सुख । गंडस्थळींचें तेज अधिक । लखलखीत दोन्हीं भागीं ॥ ६५ ॥ त्रिभुवनींचें तेज एकवटलें । बरवेपण शिगेसी आलें । दोन्हीं पातयांनीं धरिलें । तेच नेत्र श्रीहरीचे ॥ ६६ ॥ व्यंकटा भृकुटिया सुनीळा । कर्णद्व्ययाची अभिनव लीळा । कुंडलांच्या फांकती कळा । तो सुखसोहळा अलौकिक ॥ ६७ ॥ भाळ विशाळ सुरेख । वरती शोभे कस्तूरीटिळक । केश कुरळ अलौकिक । मस्तकावरी शोभती ॥ ६८ ॥ मस्तकीं मुकुट आणि किरीटी । सभोवतीं झिळमिळ्याची दाटी । त्यावरी मयूरपिच्छांची वेटी । ऐसा जगजेठी देखिला ॥ ६९ ॥ ऐसा तूं देवाधिदेव । गुणातीत वासुदेव । माझिया भक्तीस्तव । सगुणरूप झालासी ॥ ७० ॥ आतां करू तुझी पूजा । जगज्जीवना अधोक्षजा । आर्ष भावार्थ हा माझा । तुज अर्पण केला असे ॥ ७१ ॥ करूनि पंचामृतस्नान । शुद्धोदक वरी घालून । तुज करूं मंगलस्नान । पुरुषसुक्तेंकरूनियां ॥ ७२ ॥ वस्त्रें आणि यज्ञोपवीत । तुजलागीं करूं प्रीत्यर्थ । गन्धाक्षता पुष्पें बहुत । तुजलागीं समर्पूं ॥ ७३ ॥ धूप दीप नैवेद्य । फल तांबूल दक्षिणा शुद्ध । वस्त्रें भूषणें गोमेद । पद्मरागादिकरूनि ॥ ७४ ॥ भक्तवत्सला गोविन्दा । ही पूजा अंगीकारावी परमानंदा । नमस्कारूनि पादारविन्दा । मग प्रदक्षिणा आरंभिली ॥ ७५ ॥ ऐसा षोडशोपचारें भगवंत । यथाविधि पूजिला हृदयांत । मग प्रार्थना आरंभिली बहुत । वरप्रसाद मागावया ॥ ७६ ॥ जयजयाजी श्रुतिशास्त्रआगमा । जयजयाजी गुणातीत परब्रह्मा । जयजयाजी हृदयवासिया रामा । जगदुद्धारा जगद्गुरो ॥ ७७ ॥ जयजयाजी पंकजाक्षा । जयजयाजी कमळाधीशा । जयजयाजी पूर्णपरेशा । अव्यक्तव्यक्ता सुखमुर्ते ॥ ७८ ॥ जयजयाजी भक्तरक्षका । जयजयाजी वैकुंठनायका । जयजयाजी जगपालका । भक्तांसी सखा तूं एक ॥ ७९ ॥ जयजयाजी निरंजना । जयजयाजी परात्परगहना । जयजयाजी शून्यातीत निर्गुणा । परिसावी विज्ञापना एक माझी ॥ ८० ॥ मजलागीं देईं ऐसा वर । जेणें घडेल परोपकार । हेंचि मागणें साचार । वारंवार प्रार्थीतसें ॥ ८१ ॥ हा ग्रंथ जो पठण करी । त्यासी दुःख नसावें संसारीं । पठणमात्रें चराचरीं । विजयी करीं जगातें ॥ ८२ ॥ लग्नार्थियाचे व्हावें लग्न । धनार्थियासी व्हावें धन । पुत्र विजयी आणि पंडीत । शतायुषी भाग्यवंत । पितृसेवेसी अत्यंत रत । जयाचें चित्त सर्वकाळ ॥ ८४ ॥ व्याधिष्ठांची पीडा हरण । तत्काळ कीजे गोविन्दा ॥ ८५ ॥ क्षय अपस्मार कुष्ठादिरोग । ग्रंथ पठणें सरावा भोग । योगाभ्यासियासी योग । पठणमात्रें साधावा ॥ ८६ ॥ दरिद्री व्हावा भाग्यवंत । शत्रूचा व्हावा निःपात । सभा व्हावी वश समस्त । ग्रंथपठणेंकरूनियां ॥ ८७ ॥ विद्यार्थियासी विद्या व्हावी । युद्धीं शस्त्रें न लागावीं । पठणें जगांत कीर्ति व्हावी । साधु साधु म्हणोनियां ॥ ८८ ॥ अंती व्हावें मोक्षसाधन । ऐसें प्रार्थनेसी दीजे मन । एवढें मागतों वरदान । कृपानिधे गोविन्दा ॥ ८९ ॥ प्रसन्न झाला व्यंकटरमण । देवीदासासी दिधलें वरदान । ग्रंथाक्षरी माझें वचन । यथार्थ जाण निश्चयेसीं ॥ ९० ॥ ग्रंथीं धरोनी विश्वास । पठण करील रात्रन्दिवस । त्यालागीं मी जगदीश । क्षण एक न विसंबे ॥ ९१ ॥ इच्छा धरूनि करील पठण । त्याचें सांगतों मी प्रमाण । सर्व कामनेसी साधन । पठण एक मंडळ ॥ ९२ ॥ पुत्रार्थियानें तीन मास । धनार्थियानें एकवीस दिवस । कन्यर्थियानें षण्मास । ग्रंथ आदरें वाचवा॥ ९३ ॥ क्षय अपस्मार कुष्ठादिरोग । इत्यादि साधनें प्रयोग । त्यसी एक मंडळ सांग । पठणें करूनि कार्यसिध्दी ॥ ९४ ॥ हें वाक्य माझें नेमस्त । अएसें बोलिला श्रीभगवंत । साच न मानी जयाचें चित्त । त्यासी अधःपात सत्य होय ॥ ९५ ॥ विश्वास धरील ग्रंथ पठणीं । त्यासी कृपा करील चक्रपाणी । गजेन्द्राचिया आकांतासी । कैसा पावला हृषीकेशी । प्रल्हादाचिया भावार्थासी । स्तंभांतूनि प्रकटला ॥ ९७ ॥ व्रजासाठी गोविन्दा । गोवर्धन परमानंदा । उचलोनिया स्वानन्दकंदा । सुखी केलें तये वेळीं ॥ ९८ ॥ वत्साचेपरी भक्तांसी । मोहे पान्हावे धेनु जैसी । मातेच्या स्नेहतुलनेसी । त्याचपरी घडलेंसे ॥ ९९ ॥ ऐसा तूं माझा दातार । भक्तासी घालिसी कृपेची पाखर । हा तयाचा निर्धार । अनाथनाथ नाम तुझें ॥ १०० ॥ श्रीचैतन्यकृपा अलौकिक । संतोषोनि वैकुंठनायक । वर दिधला अलौकिक । जेणें सुख सकळांसी ॥ १०१ ॥ हा ग्रंथ लिहिता गोविन्द । या वचनीं न धरावा भेद । हृदयीं वसे परमानन्द । अनुभवसिद्ध सकळांसी ॥ १०२ ॥ या ग्रंथींचा इतिहास । भावें बोलिला विष्णुदास । आणिक न लागती सायास । पठणमात्रें कार्यसिद्धी ॥ १०३ ॥ पार्वतीस उपदेशी कैलासनायक । पुर्णानन्द प्रेमसुख । त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक । मुनि सुरवर विस्मित ॥ १०४ ॥ प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी । त्रैलोक्य भजत त्रिकाळीं । ध्याती योगी आणि चन्द्रमौळी । शेषाद्रिपर्वतीं उभा असे ॥ १०५ ॥ देवीदास विनवी श्रोतया चतुरां । प्रार्थना शतक पठण करा । जावया मोक्षाचिया मन्दिरा । कांही न लागतीं सायास ॥ १०६ ॥ एकाग्रचित्तें एकांतीं । अनुष्ठान कीजे मध्यरातीं । बैसोनियां स्वस्थचित्तीं । प्रत्यक्ष मूर्ति प्रकटेल ॥ १०७ ॥ तेथें देहभावासी नुरे ठाव । अवघा चतुर्भुज देव । त्याचे चरणीं ठेवोनि भाव । वरप्रसाद मागावा ॥ १०८ ॥ ॥ इति श्रीदेवीदासविरचितं श्रीव्यंकटेशस्तोत्रं संपूर्णम् ॥

पूजा बुक करनी है?

अनुभवी, सत्यापित पंडित पूर्ण वैदिक विधि से पूजा करेंगे।

पूजा बुक करें

मराठी स्तोत्र — स्तोत्र

2 स्तोत्र
🙏

पुरोहित की प्रोफ़ाइल देखें

पुरोहित की पूरी प्रोफ़ाइल, जानकारी, सेवाएँ, फ़ोटो, समीक्षाएँ और उपलब्धता देखने और इन्हीं पुरोहित की पूजा बुक करने के लिए मुफ़्त खाता बनाएँ या लॉगिन करें।

VedPurohit ऐपपंचांग, आरती, पूजा बुकिंग और कुंडली — मोबाइल पर, इंटरनेट के बिना भी। ऐप डाउनलोड करें

WhatsApp पर मदद

खाता बनाए बिना पूछें — हमारी टीम WhatsApp पर जल्दी जवाब देगी।

किस बारे में मदद चाहिए?

कौन-सी पूजा, कब और कहाँ — हम सही पंडित और दक्षिणा बताएँगे।

संदेश ऐसा जाएगा
WhatsApp पर भेजें

"भेजें" दबाने पर यह संदेश WhatsApp में खुलेगा; वहाँ आप इसे बदल सकते हैं।