जय देव जय देव श्रीमंगेशा
देवता: श्री शंकर
मूळ शब्द
जय देव जय देव श्रीमंगेशा ।
पंचारति ओवाळू सदया सर्वेशा ॥ धृ. ॥
सदया सगुणा शंभो अजिनांबरधारी ।
गौरीरमणा आद्या मदनांतकारी ॥
त्रिपुरारी अधहारी ।
शिवमस्तकधारी ।
विश्वंबर विरुदे हें नम संकट धारिं ॥ १ ॥
भयकृत भयानाशन ही नामें तुज देवा ।
विबुधादिक कमळासन वांछिती तव सेवा ॥
तुझे गुण वर्णाया वाटतसे हेवा ।
अभिनय कृपाकटाक्षें मतिउत्सव द्यावा ॥ जय. ॥ २ ॥
शिव शिव जपतां शिव तू करिसी निजदासा ।
संकट वारी मम तूं करिं शत्रुविनाशा ॥
कुळवृद्धीते पाववि हीच असे आशा ।
अनंतसुत वांछितसे चरणांबुजलेशा ।
जय देव जय देव. ॥ ३ ॥
पूजा बुक करायची आहे?
अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.