जय जय त्र्यंबकराज

शंकराची आरती

देवता: श्री शंकर

मूळ शब्द

जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो । त्रिशूल पाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो ॥ वृषभारुढ फणिभूषण दशभुज पंचानन शंकरा हो । विभूतिमाळाजटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ॥ धृ ॥ पडलें गोहत्येचें पातक गौतमऋषिच्या शिरी हो । त्याने तप मांडिले ध्याना आणुनि तुज अंतरी हो ॥ प्रसन्न होऊनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो । औदुंबरमुळी प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ॥ जय ॥ १॥ धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णू किती हो । आणिकही बहुतीतें गंगाद्वारादिक पर्वती हो ॥ वंदन मार्जन करिती त्याचे महादोष नासती हो । तुझिया दर्शनमात्रे प्राणी मुक्तीतें पावती हो ॥ जय ॥ २॥ ब्रह्मगिरींची भावें ज्याला प्रदक्शिणा जरी घडे हो । तैं ते काया कष्टें जंव जंव चरणी रुपती खडे हो ॥ तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघें त्याचें झडे हो । केवळ तो शिवरुपी काळ त्याच्या पाया पडे हो ॥ जय ॥ ३॥ लावुनिया निजभजनी सकळही पुरविसी मनकामना हो । संतति संपत्ति देसी अंती चुकविसी यमयातना हो ॥ शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझ्या मना हो । गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ॥ जय ॥ ४॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

शंकर — आरत्या

९ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.