उत्कट साधुनि शिळा
श्री रामचंद्र की आरती
देवता: श्री राम
मूल पाठ
पवित्र पाठ मूल भाषा में ही दिया गया है।
उत्कट साधुनि शिळा सेतु बांधोनी ।
लिंगदेह लंकापुर विध्वंसूनी ॥
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
देह अहंभाव रावण निवटोनी ॥ १॥
जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थें आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥ धृ ॥
प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।
लंका दहन करुनी अखया मारिला ॥
मारिला जंबूमाळी भुवनी त्राहाटीला ।
आनंदाची गुढी घेऊनियां आला ॥ जय ॥ २॥
निजबळें निजशक्ति सोडविली सीता ।
म्हणूनि येणें झालें अयोध्ये रघुनाथा ॥
आनंदें वोसंडे वैराग्य भरता ।
आरती घेऊन आली कौसल्या माता ॥ जय ॥ ३॥
अनाहतध्वनी गर्जती अपार ।
अठरा पद्में वानर करिती भुभुःकार ॥
अयोध्येसी आले दशरथकुमार ।
नगरीं होत आहे आनंद थोर ॥ ॥ जय ॥ ४॥
सहज सिंहासनीं राजा रघुवीर ।
सोऽहंभावें तया पूजा उपचार ॥
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
माधवदासा स्वामी आठव ना विसर ॥
जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थें आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥ ५॥
पूजा बुक करनी है?
अनुभवी, सत्यापित पंडित पूर्ण वैदिक विधि से पूजा करेंगे।