Dhanya Dhanya He Pradakshina Sadgururayachi
Deity: सद्गुरु
Original text
The sacred text is kept in its original language.
धन्य धन्य हे प्रदक्षिणा सद्गुरुरायाची ।
झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची ॥ धृ ॥
पदोपदीं अपार झाल्या पुण्याच्या राशी ।
सर्वही तीर्थें घडलीं आम्हा आदिकरुनि काशी ॥ १॥
मृदंग टाळ घोळ भक्त भावार्थें गाती ।
नामसंकीर्तनें ब्रह्मानंदें नाचती ॥ २॥
कोटि ब्रह्महत्या हरती करितां दंडवत ।
लोटांगण घालितां मोक्ष लोळे पायांत ॥ ३॥
गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा##-##निगमांसी ।
अनुभव ते जाणती जे गुरुपदिंचे रहिवासी ॥ ४॥
प्रदक्षिणा करूनि देह भावें वाहिला ।
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढें उभा राहिला ॥ ५॥
Want to book a puja?
Experienced, verified pandits will perform it with the complete Vedic ritual.