Jay Jay Tryambakaraj
Aarti of Shankar
Deity: श्री शंकर
Original text
The sacred text is kept in its original language.
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो ।
त्रिशूल पाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो ॥
वृषभारुढ फणिभूषण दशभुज पंचानन शंकरा हो ।
विभूतिमाळाजटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ॥ धृ ॥
पडलें गोहत्येचें पातक गौतमऋषिच्या शिरी हो ।
त्याने तप मांडिले ध्याना आणुनि तुज अंतरी हो ॥
प्रसन्न होऊनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो ।
औदुंबरमुळी प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ॥ जय ॥ १॥
धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णू किती हो ।
आणिकही बहुतीतें गंगाद्वारादिक पर्वती हो ॥
वंदन मार्जन करिती त्याचे महादोष नासती हो ।
तुझिया दर्शनमात्रे प्राणी मुक्तीतें पावती हो ॥ जय ॥ २॥
ब्रह्मगिरींची भावें ज्याला प्रदक्शिणा जरी घडे हो ।
तैं ते काया कष्टें जंव जंव चरणी रुपती खडे हो ॥
तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघें त्याचें झडे हो ।
केवळ तो शिवरुपी काळ त्याच्या पाया पडे हो ॥ जय ॥ ३॥
लावुनिया निजभजनी सकळही पुरविसी मनकामना हो ।
संतति संपत्ति देसी अंती चुकविसी यमयातना हो ॥
शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझ्या मना हो ।
गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ॥ जय ॥ ४॥
Want to book a puja?
Experienced, verified pandits will perform it with the complete Vedic ritual.