Jamadagni Kulabhushan
Aarti of Parashuram
Deity: श्री परशुराम
Original text
The sacred text is kept in its original language.
जमदग्नीकुळभूषण मुक्ता फळदशना ।
अतिसज्जन मनमोहनरजनीकरवदना ।
अगणित महिमा तुझा न कळे सुरगणा ।
वदतो कंठी वाणी सरसीरुहनयना ॥ १॥
जय राम श्रीराम जय भार्गवरामा ।
नीरांजन करूं तुजला परिपूर्णकामा ॥ धृ ॥
सह्याद्रिगिरिशिखरीं शर घेऊनी येसी ।
सोडुनी शर पळवीसी पश्चिमजलधीसी ।
तुजसम रणधीर जगी न पडे दृष्टीसी ।
प्रताप थोर तुझा न कळे कवणासी ॥ जय ॥ २॥
तव कोप बहु पापी बा संहारी ।
दानव दहन करोनी वससी गिरिशिखरी ।
क्शत्रिय मारूनि अवनी केली निर्वैरी ।
सात्विक राजस तामस त्रिगुणां उद्धरी ॥ जय ॥ ३॥
दृढ भावे तव वंदन करिती जे चरणी ।
त्यांचे भवभय नाही जंववरि शशितरणी ।
शर मारुनी उद्भवली गंगा जनतरणी ।
चिंतामणि शरणागत निश्चल तव चरणी ॥ जय ॥ ४॥
Want to book a puja?
Experienced, verified pandits will perform it with the complete Vedic ritual.