उत्कट साधुनि शिळा

श्री रामचंद्राची आरती

देवता: श्री राम

मूळ शब्द

उत्कट साधुनि शिळा सेतु बांधोनी । लिंगदेह लंकापुर विध्वंसूनी ॥ कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह अहंभाव रावण निवटोनी ॥ १॥ जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थें आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥ धृ ॥ प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला । लंका दहन करुनी अखया मारिला ॥ मारिला जंबूमाळी भुवनी त्राहाटीला । आनंदाची गुढी घेऊनियां आला ॥ जय ॥ २॥ निजबळें निजशक्ति सोडविली सीता । म्हणूनि येणें झालें अयोध्ये रघुनाथा ॥ आनंदें वोसंडे वैराग्य भरता । आरती घेऊन आली कौसल्या माता ॥ जय ॥ ३॥ अनाहतध्वनी गर्जती अपार । अठरा पद्में वानर करिती भुभुःकार ॥ अयोध्येसी आले दशरथकुमार । नगरीं होत आहे आनंद थोर ॥ ॥ जय ॥ ४॥ सहज सिंहासनीं राजा रघुवीर । सोऽहंभावें तया पूजा उपचार ॥ सहजांची आरती वाद्यांचा गजर । माधवदासा स्वामी आठव ना विसर ॥ जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थें आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥ ५॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

राम — आरत्या

८ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.