आरती भुवनसुंदराची

विठ्ठलाची आरती

देवता: श्री विठ्ठल

मूळ शब्द

आरती भुवनसुंदराची । इंदिरावरा मुकुंदाची ॥ धृ. ॥ पद्मसमपादयुग्मरंगा । ओंवाळणी होती भृंगा । नखमणि स्त्रवताहें गंगा जे कां त्रिविधतापभंगा ॥ चाल ॥ वर्तुळ गुल्फ भ्राजमानें । किंकिणीक्वणित नाद घणघणित, वांकिवर झुणित, नुपुरें झनन मंजिराची ॥ झनन ध्वनि मंजिराची ॥ आरती. ॥ १ ॥ पीतपट हाटकतप्त वर्णी । कांची नितंब सुस्थानी ॥ नाभिची अगाध हो करणी । विश्वजनकाची जे जननी ॥ चाल ॥ त्रिवली ललित उदरशोभा । कंबुगळां माळ, विलंबित झळाळ कौस्तुभ सरळ, बाहु श्रीवत्सतरळमणिमरळ कंकणाची ॥ प्रीति बहु जडित कंकणाची ॥ आरती. ॥ २ ॥ इंदुसम आस्य कुंदरदना । अधरारुणार्क बिंबवदना ॥ पाहतां भ्रांति पडे मदना । सजल मेघाब्धि दैत्यदमना ॥ चाल ॥ झळकत मकरकुंडलाभा कुटिलकुंतली, मयूर पत्रावली वेष्टिले तिलक भाळी केशरी झळाळित कृष्णाकस्तुरींची । अक्षता काळि कस्तुरीची ॥ आरती. ॥ ३ ॥ कल्पद्रूमातळीं मूर्ती सौदामिनी कोटिदीप्ती । गोपीगोपवलय भवती ॥ त्रिविष्टप पुष्पवृष्टि करिती ॥ चाल ॥ मंजुळ मधुर मुरलीनादें । चकित गंधर्व चकित अप्सरा, सुरगिरिवरा, कर्पूराधर रतीनें प्रेमयुक्त साची ॥ आरती ओवाळित साची ॥ आरती. ॥ ४ ॥ वृंदावनीचिये हरणी । सखे गे कृष्ण माय बहिणी ॥ श्रमलों भवब्धिचें फिरणीं । आतां मज ठाव देई चरणीं ॥ चाल ॥ अहा हे पूर्ण पुण्यश्लोका ॥ नमितों चरण शरण, मी करुणा येऊं दे विषाणपाणी कृष्ण नेणतें, बाळ आपुलें राखि लाज याची ॥ दयानिधे राखि लाज याची ॥ आरती ॥ ५ ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

विठ्ठल — आरत्या

१३ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.