आरती सप्रेम

दशावताराची आरती

देवता: श्री विठ्ठल

मूळ शब्द

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म । भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ॥ धृ. ॥ अंवऋषी कारणे गर्भवास सोशीसी । वेद नेले चोरुनि ब्रह्मा आणुनिया देसी । मत्स्यरुपीं नारायण सप्तहि सागर धुंडीसी । हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ १ ॥ रसा तळाशी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।परोपकारासाठी देवा कांसव झालासी ॥ दाढें धरुनी पृथ्वी नेता वराहरुप होसी । प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी ॥ २ ॥ पांचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी । भिक्षे स्थळ मागुनी बळिला पाताळी नेसी ॥ सर्व समर्पण केले म्हणउनि प्रसन्न त्या होसी । वामनरूप धरूनी बळिच्याद्वारी तिष्ठसी ॥ ३ ॥ सगस्त्रार्जुन मातला जमंदग्नीचा वध केला । कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला ॥ नि:क्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला । सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ ४ ॥ मातला रावण सर्वा उपद्रव केला । तेहतिस कोटी देव बंदी हरलें सीतेला ॥ पितृवचना लागीं रामें वनवास केला । मिळोनी वानर सहित राजाराम प्रगटला ॥ ५ ॥ देवकी वसुदेव बंदी मोचन त्वां केलें । नंदाघरि जाऊन निजसुख गोकुळा दिधले ॥ गोरसचोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळविले । गोपिकांचे प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ ६ ॥ बौद्ध कलंकी कवियुगी झाला अधर्म हा अवघा । सांडुनि नित्यधर्म सोडुनि नंदाची सेवा ॥ म्लेंच्छमर्दन करिसी म्हणुनी कलंकी केशवा । बहिरवि जान्हवि द्याचि निजसुखा नंदसेवा ॥ ७ ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

विठ्ठल — आरत्या

१३ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.