नैवेद्य आरती

जय देव जय देव जय विठाबाई

देवता: श्री विठ्ठल

मूळ शब्द

जय देव जय देव जय विठाबाई । पक्वान्नादी सिद्धी अर्पी तुज ठायीं ॥ धृ॥ षड्रसपक्वान्नें हीं अर्पित तुज माई । कृपा करुनी तीं तूं मान्य करुनि घेई ॥ तृप्ती सर्व जीवां जेवितां तूं आई । जीवन सर्वांचें हें असे तव पायीं ॥ १॥ आनंदें भोजन करावें आतां । यथेच्छ जेवूनी उच्छिष्ट उरतां ॥ प्रसाद तो देई आपुल्या भक्ता । हेंचि मागें ठेवूनि तव चरणीं माथा ॥ २॥ ॥ नीरांजन आरती ॥ पंचप्राणांचें नीरांजन करुनी । पंचतत्त्वें वाती परिपूर्ण भरुनी ॥ मोहममतेनें समूळ भिजवोनी । अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोनी ॥ १॥ जय देव जय देव जय नीरांजना । नीरांजन ओवाळूं तुझिया समचरणा ॥ धृ॥ ज्वाला ना काजळी दिवस न राती । सदोदित प्रकाश भक्तीनें प्राप्ती ॥ पूर्णानंदें धालों बोलों मी किती । उजळों हे शिवराम भावें ओंवाळीती ॥ २॥ ॥ धृ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

विठ्ठल — आरत्या

१३ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.