Mulpeeth Yamunagari
Aarti of Renuka Devi (Mahur)
Deity: श्री रेणुका
Original text
The sacred text is kept in its original language.
मूळपीठ यमुनागारी ।
माता आदिकुमारी ॥
नेसली पितांबर उभा राहे शिखरीं ।
भक्ताचीं वाट पाहे ॥
कर निढळावरी ॥ १ ॥
जय देवी आदिमातें ॥
जय हो कृपावंते ॥
आरती ओवाळीन ।
एक मनोभावे चित्तें ॥ धृ. ॥
मळवट कस्तुरीचा ।
गळा हार रत्नांचा ॥
त्रिशूळ डमरू हातीं ।
गर्व हरिला दैत्यांचा ॥
वधिला महिषासुर ।
थोर प्रताप भूजांचा ॥ जय. ॥ २ ॥
शृंगार जडित लेणे ।
कटडियांची भूषणे ॥
अंदुवा झणत्कार ।
ढाळ देती रत्नांचा ॥
पाईचे पोल्हार ।
वाजती रुणझुण ॥ जय. ॥ ३ ॥
वळली हे कामधेनू ।
पय दाटले स्तनी ॥
अगम्य महिमा तुझा ।
वर्णिती वेदपुराणी ॥
यालागी माते चरणी ।
शरण आलो लोटांगणी ॥ जय. ॥ ४ ॥
तव रूप वर्ण अंबा ।
माझा केवढा केवा ॥
वर्णितां मोक्ष होय ।
भक्त चरणी राखावा ॥
वेडा हा विप्रदास ।
तुझें चरणीं असावा ॥ जय. ॥ ५ ॥
Want to book a puja?
Experienced, verified pandits will perform it with the complete Vedic ritual.