Ovalu Aarti Majhya Pandhariraya
Dhup aarti (incense)
Deity: श्री विठ्ठल
Original text
The sacred text is kept in its original language.
ओवाळूं आरती माझ्या पंढरीराया, माझ्या पंढरीराया ।सर्वभावें शरण आलो तुझीया पायां ॥ धृ. ॥
सर्व व्यापुनि कैसे रूप राहिलें अकळ, रूप राहिले अकळ ।तो हा गवळ्याघरी झाला कृष्ण गोपाळ ॥ १ ॥
स्वरीप गुणातीत अवतार धरीं, अवतार धरीं ॥तो हा पांडुरंग उभा विटेवरी ॥ २ ॥
भक्तांचा काजा कैसा रूपासी आला, कैसा रूपासी आला ।ब्रीदाचा तोडरू चरणी मिरविला ॥ ३ ॥
आरती कैसी ओवाळीली, कैसी ओवाळीली । वाखाणिता कीर्ति वाचा परतली ॥ ४ ॥
भावभक्तीबळें होसी कृपाळू देवा, होसी कृपाळू देवा ॥तुका म्हणे तुझ्या न कळता भावा ॥ ५ ॥
Want to book a puja?
Experienced, verified pandits will perform it with the complete Vedic ritual.