Ovalu Ga Maye Vitthal Sabahya Sajira
Aarti of Vitthal
Deity: श्री विठ्ठल
Original text
The sacred text is kept in its original language.
ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा ।
राईरखुमाबाई सत्यभामेच्या वरा ॥ धृ ॥
कनकाचे पर्येळी उजळोनी आरती ।
रत्नदीपशोभा कैशा प्रकाशल्या ज्योती ॥ ओवाळूं ॥ १॥
मंडित चतुर्भुज कानीं शोभत कुंडले ।
श्रीमुखाची शोभा पाहतां तेज फांकले ॥ ओवाळूं ॥ २॥
वैजयंती माळ गळा शोभे स्यमंत ।
शङ्खचक्रगदापद्म आयुधें शोभत ॥ ओवाळूं ॥ ३॥
सांवळा सुंदर जैसा कर्दळीचा गाभा ।
चरणीईंचीं नूपुरें वांक्या गाजती नभा ॥ ओवाळूं ॥ ४॥
ओवाळीता मन माझें ठाकलें ठायी ।
समाधिस्थसमान तुकया लागला पायी ॥ ओवाळूं ॥५॥
Want to book a puja?
Experienced, verified pandits will perform it with the complete Vedic ritual.