Nirop Aarti (farewell)
Jahale Bhajan
Deity: श्री विठ्ठल
Original text
The sacred text is kept in its original language.
जाहलें भजन आम्ही नमितों चरणा । नमितों तव चरणा ।
वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना ॥ धृ॥
दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातों । देवा तुजलाची ध्यातों ।
प्रेमें करुनियां देवा गुण तुझे गातों ॥ १॥
तरी न्यावी सिद्धी देवा हेची वासना । देवा हेची वासना ।
रक्षूनियां सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा ॥ २॥
मागणें तें देवा आतां एकची आहे । आतां एकची आहे ।
तरुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहें ॥ ३॥
जेव्हां सर्व आम्ही मिळूं ऐशा या ठाया । ऐशा या ठाया ।
प्रेमानंदें लागू तुझी कीर्ती गावया ॥ ४॥
सदा ऐशी भक्ती राहो आमुच्या मनीं । आमुच्या मनीं ।
हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ॥ ५॥
वारुनियां संकटें आतां आमुचीं सारी। आतां आमुची सारी ।
कृपेची साउली देवा दीनावरि करीं ॥ ६॥
निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी । चिंता तुम्हा असावी ।
सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ॥ ७॥
निरोप घेतों आतां आम्हां आज्ञा असावी ।
चुकलें आमुचें कांहीं त्याची क्षमा असावी ॥
Want to book a puja?
Experienced, verified pandits will perform it with the complete Vedic ritual.