प्रपंचरचना सर्वहि भोगूनि त्यागिली
तुकाराम की आरती
देवता: संत तुकाराम
मूल पाठ
पवित्र पाठ मूल भाषा में ही दिया गया है।
प्रपञ्चरचना सर्वहि भोगूनि त्यागिली ।
अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धि हरविली ॥
वैराग्याची निष्ठा प्रगटुनि दाखविली ।
अहंममता दवडुनि निजशान्ती वरिली ॥ १॥
जय जयाजी सद्गुरु तुकया दातारा ।
तारक तू सकळांचा जिवलग सोयरा ॥ धृ॥
हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला ।
विरक्त ज्ञानाचा ठेवा उघडुनि दाखविला ॥
जगदुद्धारालागीं उपाय सुचविला ।
निंदक दुर्जनाचा संदेह निरसीला ॥ धृ॥ २॥
तेरा दिवस वह्या रक्शुनियां उदकीं ।
कोरड्याचि काढुनि दाखविल्या शेखी ॥
अपार कविताशक्ति मिणवुनि इहलोकीं ।
कीर्तन श्रवणें तुमच्या उद्धरति जन लोकीं ॥ धृ॥ ३॥
बाळवे घेऊनि श्रीहरी भेटला ।
विधि जनिता तोचि आठव हा दीधला ॥
तेणें ब्रह्मानन्दे प्रेमा डोलविला ।
न तुके म्हणोनि तुका नामीं गौरविला ॥ धृ॥ ४॥
प्रयाणकाळीं देवें विमान पाठविलें ।
कळिच्या काळामाजी अद्भुत वर्तविलें ॥
मानव देह घेऊनि निजधामा गेले ।
निळा म्हणे सकळ संत तोषविले ॥ धृ॥ ५॥
पूजा बुक करनी है?
अनुभवी, सत्यापित पंडित पूर्ण वैदिक विधि से पूजा करेंगे।