काकड आरती परमात्मया श्रीरघुपती
समर्थ रामदास
देवता: काकड आरती
मूळ शब्द
कांकड-आरती परमात्मया रघुपती ।
जीवीं जीवा ओंवाळित निजीं निजात्मज्योति ॥ध्रु०॥
त्रिगुण कांकडा द्वैतधृतें तिंबिला ।
उजळली आत्मज्योति तेणें प्रकाश फांकला ॥१॥
काजळी ना दीप अवधें तेज डळमळ ।
अवनी ना अंबर अवधा निगूढ निश्चळ ॥२॥
उदय ना अस्त जेथें बोध प्रातःकाळीं ।
रामी रामदास सहजीं सहज ओंवाळी ॥३॥
पूजा बुक करायची आहे?
अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.