निरोप आरती

जाहलें भजन

देवता: श्री विठ्ठल

मूळ शब्द

जाहलें भजन आम्ही नमितों चरणा । नमितों तव चरणा । वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना ॥ धृ॥ दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातों । देवा तुजलाची ध्यातों । प्रेमें करुनियां देवा गुण तुझे गातों ॥ १॥ तरी न्यावी सिद्धी देवा हेची वासना । देवा हेची वासना । रक्षूनियां सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा ॥ २॥ मागणें तें देवा आतां एकची आहे । आतां एकची आहे । तरुनियां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहें ॥ ३॥ जेव्हां सर्व आम्ही मिळूं ऐशा या ठाया । ऐशा या ठाया । प्रेमानंदें लागू तुझी कीर्ती गावया ॥ ४॥ सदा ऐशी भक्ती राहो आमुच्या मनीं । आमुच्या मनीं । हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी ॥ ५॥ वारुनियां संकटें आतां आमुचीं सारी। आतां आमुची सारी । कृपेची साउली देवा दीनावरि करीं ॥ ६॥ निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी । चिंता तुम्हा असावी । सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी ॥ ७॥ निरोप घेतों आतां आम्हां आज्ञा असावी । चुकलें आमुचें कांहीं त्याची क्षमा असावी ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

विठ्ठल — आरत्या

१३ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.