नानादेहीं देव एक विराजे
आत्मारामाची आरती
देवता: आत्माराम
मूळ शब्द
जय देव जय देव जय आत्मारामा ।
निगमागमशोधितां न कळे गुणसीमा ॥ धृ. ॥
नाना देही देव एक विराजे ।
नाना नाटक लीला सुंदर रुप साजे ॥
नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गति भाजे ।
अगाध महिमा पिंडब्रह्मांडी गाजे ॥ १ ॥
बहुरुपी बहुगुणी बहुतां कलांचा ।
हरिहरब्रह्मादिक देव सकळांचा ॥
युगानुयुगी आत्माराम आमुचा ॥
दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ॥ २ ॥
पूजा बुक करायची आहे?
अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.