जय जय श्रीशनिदेवा

शनैश्चराची आरती

देवता: श्री शनिदेव

मूळ शब्द

जय जय श्रीशनिदेवा ॥ श्री पद्मकर शिरीं ठेवा ॥ आरती ओवाळीतों ॥ मनोभावें करूनी सेवा ॥ ध्रु०॥ सूर्यसूता शनिमूर्ती ॥ तुझी अगाध कीर्ती ॥ एकमुखें काय वर्णूं ॥ शेषा न चले स्फूर्ती ॥ जय० ॥ १ ॥ नवग्रहांमाजी श्रेष्ठा ॥ पराक्रम थोर तुझा ॥ ज्यावरी तूं कृपा करिसी ॥ होय रंकाचा राजा ॥ जय० ॥ २ ॥ विक्रमासारिखा हो ॥ शतकर्ता पुण्यराशी ॥ गर्व धरितां शिक्षा केली ॥ बहु छळियेलें त्यासी ॥ जय० ॥ ३ ॥ शंकराच्या वरदानेम ॥ गर्व रावणें केला ॥ साडेसाती येतां त्यासी ॥ समूळ नाशासी नेला ॥ जय० ॥ ४ ॥ प्रत्यक्ष गुरूनाथा चमत्कार दावियेला ॥ नेउनी शूळापाशीं ॥ पुन्हां सन्मान केला ॥ जय० ॥ ५ ॥ ऎसे गुण किती गाऊं ॥ धणी न पुरे गातां ॥ कृपा करीं दिनावरी ॥ महाराजा समर्था ॥ जय० ॥ ६ ॥ दोन्ही कर जोडोनियां ॥ रखमा लीन सदा पायीं ॥ प्रसाद हाचि मागे ॥ उदयकाळ सौख्य दावीं ॥ जय० ॥ ७ ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

इतर देव — आरत्या

१२ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.