जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार

खंडोबाची आरती

देवता: श्री खंडोबा

मूळ शब्द

जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार । मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥ नानापरिची रचना रचिली अपार । तये स्थळी नांदे स्वामी शंकर ॥ १ ॥ जय देव जय देव शिवमार्तंडा । अरिमर्दन मल्लारी तूंची प्रचंडा ॥ धृ. ॥ मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला । त्रिभुवनी त्याने प्रळय मांडिला ॥ नाटोपे कोणास वरे मातला । देवगण गंधर्व कांपती त्याला ॥ जय. ॥ २ ॥ चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी । मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी । चरणी पृष्ठी खंङ्‌गें वर्मी स्थापीसी । अंती वर देउनि त्या मुक्तीते देशी ॥ जय. ॥ ३ ॥ मणिमल्ल दैत्य मर्दुनी मल्लारी । देवा संकट पडतां राहे जेजुरी ॥ अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी । देवा ठाय मागे दास नरहरि ॥ जय. ॥ ४ ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

इतर देव — आरत्या

१२ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.