जय देव जय देव जय खंडेराया

निरंजन स्वामी

देवता: श्री खंडोबा

मूळ शब्द

जयदेव जयदेव जय खंडेराया । भवतम संहारुनिया दाखवि निजमाया ॥धृ॥ ॥ शिवशंकर गौरीवर हर करुणाकर । निजभक्ताच्या साठीं घेउनि अवतार भूलोकाच्या ठायीं येवुनि सत्वर । मणि - मल्हादिक दैत्या केला संहार ॥१॥ सर्वांगातें लावुनि भंडार पिवळा । कंठीं भूषण शोभे रुद्राक्षमाळा । सह्याद्रीचे वरुते बैसुनि अवलीळा । हरहर वदनीं बोलतसे वेळोवेळां ॥२॥ वसवोनिया बहुसुंदर सुस्थळ जेजोरी । महाळसा शोभतसे वामांकावरी । रघुविर - प्रिय अवतार तो हा मल्हारी । ह्मणवुनि निरंजन गुण गातो बहुपरी ॥३॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

इतर देव — आरत्या

१२ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.