जय देवा मार्तंडा

खंडोबाची आरती

देवता: श्री खंडोबा

मूळ शब्द

जय देवा मार्तंडा । हाती घेउनिया खंडा ॥ मारिले दुष्ट दैत्य । उडे त्रैलोकी झेंडा ॥ धृ. ॥ मातले पृथ्वीवरि । आणि मल्ल दैत्य दोनी ॥ टाकिले ऋषीयाग । यज्ञकुंड विध्वंसुनी ॥ म्हणुनीया अवतरले । गौरीहर शूळपाणी ॥ जय. ॥ १ ॥ साठ कोटी गण सवें । घेउनियां दैत्यावरी ॥ जाऊनियां युद्ध केलें । रण तुंबल भारी ॥ शिवचक्र दैत्यचक्र । युद्ध होय बरोबरी ॥ जय. ॥ २ ॥ त्रिशुळपाणी तप्त । थोर झाले क्रोधामुळें ॥ मारिले खङ्‌ग जेव्हां । दैत्याचे कंठनाळीं ॥ वरदान मागताती । प्राण अंताचे वेळी ॥ जय. ॥ ३ ॥ मल्ल म्हणे कर्पूरगौरा । हर हर महादेवा मल्हारी जनमुखिं ॥ ऎसा उच्चार व्हावा । उद्धरिले असुरातें । म्हणुनीं मल्लारी नांवा । जय. ॥ ४ ॥ चंपाषष्ठीचे दिवशी । ऎसा अवतार झाला ॥ आनंदले सुरवर । म्हणुनी येळकोट बोला ॥ चरणी तुझे लीन नामा ॥ देवा सांभाळी त्याला ॥ जय देवा. ॥ ५ ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

इतर देव — आरत्या

१२ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.