जयदेवी जयदेवी जय देववंद्ये

अनसूयेची आरती

देवता: श्री अनसूया

मूळ शब्द

जयदेवी, जयदेवी, जय देववंदे । श्रीवेदवंदे श्रीअनसूये, माये, जय मंगळ वरदे ॥धृ०॥ जयजय श्रीचतुराननदेवात्मज कांते जयजय कर्दमदुहिते, दत्तात्रय माते येती तडि तापडि यति भवदाश्रमातें पावति मुनिजन-खगमृगगण-विश्रामातें ॥जय० ॥१॥ नाना गुल्मलताद्रुम-अमृतरसवल्ल्या आनंदघन पदवैभव श्रीहरि कैवल्या सुपुत्रवंत्या भार्गवि, देवकि, कौसल्या वानिति अनसूये तव बहुविध कौशल्या ॥जय० ॥२॥ देउनि भोजन सकळां सकळांच्या पाठीं करसी भोजन स्वसुतासह एक्या ताटीं अनंत ब्रम्हांडांचे घट ज्याचे पोटीं तो प्रभु ढेंकर देउनि अन्नांगुल चाटी ॥जय० ॥३॥ श्रीलक्ष्मी-पार्वति-सावित्रीसहभर्त्या अखंड ऋद्धीसिद्धी नांदति गिरिवरि त्या चौसष्ट-अठरा करती त्वद्‌गुणआवर्त्या विष्णूदासाच्याही ऐकिसि पदार्त्या ॥जय० ॥४॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

देवी — आरत्या

२७ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.