सुखसदने शशिवदने

अंबेची आरती

देवता: श्री अंबाबाई

मूळ शब्द

सुखसदने शशिवदने अंबे मृगनयने । गजगमने सुरनमने कोल्हापुरमथने ॥ सुरवर वर्षति सुमनें करुनियां नमनें । भयहरणे सुखकरणे सुंदरी शिवरमणे ॥ १ ॥ जय देवी जय देवी वो जय अंबे । कोल्हापुराधिस्वामिणि तुज वो जगदंबे ॥धृ. ॥ मृगमदमिश्रित केशर शोभत तें भाळीं । कुंचित केश विराजित मुगुटांतून भाळीं । रत्नजडित सुंदर अंगी कांचोळी । चिद्‌गगनाचा गाभा अंबा वेल्हाळी ॥ जय. ॥ २ ॥ कंठी विलसत सगुण मुक्ता सुविशेषें । पीतांबर सुंदर कसियेला कांसे । कटितटि कांची किंकिणि ध्वनि मंजुळ भासे । पदकमळलावण्यें अंबा शोभतसे ॥ जय. ॥ ३ ॥ झळझळ झळझळ झळकति तानवडें कर्णी । तेजा लोपुनि गेले रविशशि निज करणीं । ब्रह्महरिहर सकळिक नेणति तव करणी । अद्‌भुत लीला लिहितां न पुरे ही धरणी ॥ जय. ॥ ४ ॥ अष्टहि भूजा सुंदर शोभतसे शोभे । झगझग झगझग झगति लावण्यगाभा । म्हगम्हग म्हगम्हग म्हगीत समनांची शोभा । त्र्यंबक मधुकर होउनि वर्णितसे अंबा ॥ ५ ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

देवी — आरत्या

२७ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.