आरती ब्रह्मकुमारी
सरस्वतीची आरती
देवता: श्री सरस्वती
मूळ शब्द
आरती ब्रह्मकुमारीला - वागेश्वरी शारदेला ॥ धृ. ॥
निर्मला श्वेत कोमलांगा - त्रिगुणात्मिका पूर्ण रंगा सत्कती पुण्य धर्म संगा - अविद्या पाप ताप भंगा ॥
मुखांबुज चंद्रबिंब शोभा - कांतिकुमार, दिव्य सुमहार, कंठि नगभार शोभती ब्रह्मचारिणीला ॥ १ ॥
शंख विधु कुंद धवलवासातुषार प्रभा इंदु हासा मयूरावृता निकट हंसा-विधुन्निभा तेज भाषाकमलासना शुभ्रदीप्ती - वरदकर चार, ज्ञान अवतार, बुद्धि आधार, चंद्रिका - सुधारत्न भाला ॥ २॥
वीणा अक्षरसूत्रमाला - प्रतिमा - ग्रंथ करी धरिला दृष्टिन त्रिताप तम - शमला - विष्णुशिव करिती दनाला - अंबिका नृत्य गानशीला स्फूर्तिसंभार, काव्य विस्तार कल्पनासार, भावना - सरस्वती बाला ॥ ३ ॥
वागेश्वरी ॥
पूजा बुक करायची आहे?
अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.