श्री अन्नपूर्णा देवीची आरती

देवता: श्री अन्नपूर्णा

मूळ शब्द

श्री अन्नपूर्णे देवी जयजय जगदंबे जननीं । तुज ऎसी देवता नाही कोणी त्रिभूवनी ॥ धृ. ॥ विप्र धनंजय त्याची भार्या सुलक्षण होती । ती दोघेही अनन्यभावे तव भक्ति करिती ॥ तुझ्य़ा प्रसादे झाली त्यांना पुत्राची प्राप्ती ॥ सुखशांती लाभली देवी ऎशी तव कीर्ती ॥ १ ॥ नरदेहाचें सार्थक होते तव पूजन करुनी । नामस्मरणे सकलही जाती भवसागर तरुनी ॥ जीवन जरि हें भरले आहे व्याधि - उपाधींनीं । प्रसन्न परि तू होता सारे भय जाते पळूनी ॥ २ ॥ छंद मनाला तुझा लागला मी करितो धांवा । धावुनी ये देंवते पाहुनी मम भक्तीभावा ॥ अखंड शाश्वत प्रेमसुखाचा दे मजला ठेवा ॥ जन्ममृत्यूचा फेरा चुकवी ठाव पदी द्यावा ॥ ३ ॥ तूं माझी माऊली जाण मी बालक तव तान्हा । क्षमस्व माते अपराधांची करूं गणना ॥ अन्नवस्त्र दे वैभव सारे सुखभोगहि नाना । मिलिंदमाधव करी प्रार्थना वंदुनी तव चरणां ॥ ४ ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

देवी — आरत्या

२७ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.