जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता
महालक्ष्मीची आरती
देवता: श्री महालक्ष्मी
मूळ शब्द
जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता ।
प्रसन्न होऊनिया वर देई आता ॥ धृ॥
विष्णुप्रिये तुझी सर्वांतरी सत्ता ।
धन दौलत देई लक्ष्मीव्रत करिता ॥ १॥
विश्वव्यापक जननी तुज ऐसी नाही ।
धावसी आम्हालागी पावसी लवलाही ॥ २॥
त्रैलोक्य धारिणी तू भक्ता लाभे सुखशांती ।
सर्व सर्वही दुःख सर्व ती पळती ॥ ३॥
वैभव ऐश्वर्याचे तसेच द्रव्याचे ।
देसि दान वरदे सदैव सौख्याचे ॥ ४॥
यास्तव अगस्ती बन्धु आरती ओवाळी ।
प्रेमे भक्तासवे लोटांगण घाली ॥ ५॥
पूजा बुक करायची आहे?
अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.