मूळपीठ यमुनागारी

रेणुका (माहूर) देवीची आरती

देवता: श्री रेणुका

मूळ शब्द

मूळपीठ यमुनागारी । माता आदिकुमारी ॥ नेसली पितांबर उभा राहे शिखरीं । भक्ताचीं वाट पाहे ॥ कर निढळावरी ॥ १ ॥ जय देवी आदिमातें ॥ जय हो कृपावंते ॥ आरती ओवाळीन । एक मनोभावे चित्तें ॥ धृ. ॥ मळवट कस्तुरीचा । गळा हार रत्नांचा ॥ त्रिशूळ डमरू हातीं । गर्व हरिला दैत्यांचा ॥ वधिला महिषासुर । थोर प्रताप भूजांचा ॥ जय. ॥ २ ॥ शृंगार जडित लेणे । कटडियांची भूषणे ॥ अंदुवा झणत्कार । ढाळ देती रत्नांचा ॥ पाईचे पोल्हार । वाजती रुणझुण ॥ जय. ॥ ३ ॥ वळली हे कामधेनू । पय दाटले स्तनी ॥ अगम्य महिमा तुझा । वर्णिती वेदपुराणी ॥ यालागी माते चरणी । शरण आलो लोटांगणी ॥ जय. ॥ ४ ॥ तव रूप वर्ण अंबा । माझा केवढा केवा ॥ वर्णितां मोक्ष होय । भक्त चरणी राखावा ॥ वेडा हा विप्रदास । तुझें चरणीं असावा ॥ जय. ॥ ५ ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

देवी — आरत्या

२७ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.