अश्वपती पुसता झाला

वटसावित्रीची आरती

देवता: सावित्री

मूळ शब्द

अश्वपती पुसता झाला । नारद सांगताती तयाला ॥ अल्पायुषी सत्यवंत । सावित्रीनें कां प्रणीला ॥ आणखी वर वरी बाळें । मनि निश्चय जो केला ॥ आरती वडराजा ॥ १ ॥ दयावंत यमदूजा । सत्यवंत ही सावित्री ॥ भावें करीन मी पूजा । आरती वडराजा ॥ धृ. ॥ ज्येष्ठमास त्रयोदशी । करिती पूजन वडाशी ॥ त्रिरात्र व्रत करुनियां ॥ जिंकी तूं सत्यवंताशी ॥ आरती वडराजा ॥ २ ॥ स्वर्गावरी जाऊनियां । अग्निखांब कचळीला ॥ धर्मराज उचकला । हत्या घालील जीवाला ॥ येई गे पतीव्रते पती नेई गे आपुला । आरती वडराजा ॥ ३ ॥ जाऊनिया यमापाशीं । मागतसे आपल्या पती ॥ चारी वर देऊनिया । दयावंत द्यावा पती । आरती वडराजा ॥ ४ ॥ पतिव्रते तुझी कीर्ती ऎकूनि ज्या नारी ॥ तुझी व्रतें आचरती । तुझी भुवनें पावती ॥ आरती वडराजा ॥ ५ ॥ पतिव्रते तुझी स्तुती । त्रिभुवनी ज्या करिती ॥ स्वर्गी पुष्पवृष्टी करुनिया । आणिलासी आपला पती । अभय देऊनिया । पतिव्रते तारी त्यासी ॥ आरती वडराजा. ॥ ६ ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

देवी — आरत्या

२७ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.