वृंदावनवासी जय माये तुळसी

तुळशीची आरती

देवता: तुळशी

मूळ शब्द

वृंदावनवासी जय माये तुळसी । शिवहरिब्रह्मादीकां तूं वंद्य होसी ॥ मृत्युलोकी प्रगटुनि भक्ता उद्धरिसी । तुझें दर्शन होतां जळती अघराशीं ॥ १ ॥ जय देव जय देवी जय तुळसी माते । करिं वृद्धीं आयुध्य नारायणवनिते ॥ धृ. ॥ कार्तिकशुक्लद्वादशि कृष्णाशीं लग्न । तुझे वृंदावनी निशिदिनिं श्रीकृष्ण ॥ स्वर्गाहुनी वृष्टी करिती सुरगण । भक्त चिंतन करितां करिसी पावन ॥ जय. ॥ २ ॥ त्रिभुवनिं तुझी सेवा करिती त्रिकाळ । त्यांतें सुख देऊनी तारी गोपाळ ॥ तुझें स्तवन ऎकुनि कांपति कळिकाळ । पावन करि मज म्हणे मोरो बल्लाळ ॥ जय. ॥ ३ ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

देवी — आरत्या

२७ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.