जन्मतां पांडुरंगे जिव्हेवरी
नामदेवाची आरती
देवता: संत नामदेव
मूळ शब्द
जन्मतां पांडुरंगे जिव्हेवरी लिहिलें ।
अभंग शतकोटी प्रमाण कवित्व रचिले ॥ १॥
जय जयाजी भक्तराया जिवलग नामया ।
आरती ओंवाळीतां चित्त पालटे काया ॥ धृ ॥
घ्यावया भक्तिसुख पांडुरंगे अवतार ।
धरूनियां तीर्थमेषें केला जगाचा उद्धार ॥ जय ॥ २॥
प्रत्यक्ष प्रचितीं हे वाळवंट परिस केली ।
हारपली विषमता द्वैतबुद्धि निरसली ॥ जय ॥ ३॥
समाधि महाद्वारी श्रीविठ्ठलचरणीं ।
आरती ओंवाळीतों परिसा कर जोडुनी ॥ जय ॥ ४॥
पूजा बुक करायची आहे?
अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.