आरती संतमंडळी

संतांची आरती

देवता: संत

मूळ शब्द

आरती संतमंडळी । हातीं घेउनिं पुष्पांजुळि ओंवाळिन पंचप्राणें । त्याचें चरण न्याहाळी ॥ धृ. ॥ मच्छेंद्र गोरख ॥ गैनी निवृत्तीनाथ । ज्ञानदेव नामदेव ॥ खेचर विसोबा संत । सोपान चांगदेव ॥ गोरा जगमित्र भक्त ॥ कबीर पाठक नामा ॥ चोखा परसा भागवर ॥ आरती ॥ १ ॥ भानुदास कृष्णदास । वडवळसिद्ध नागनाथ । बहिरा पिसा मुकुंदराज । केशवस्वामी सूरदास ॥ रंगनाथ वामनस्वामी । जनजसवंत दास ॥ २ ॥ एकनाथ रामदास । यांचा हरिपदीं वास ॥ गुरुकृपा संपादिली । स्वामी जनार्दन त्यास ॥ मिराबाई मुक्ताबाई । बहिणाबाई उदास । सोनार नरहरी हा । माळी सांवता दास ॥ ३ ॥ रोहिदास संताबाई । जनी राजाई गोणाई ॥ जोगापरमानंदसाल्या । शेखमहंमद भाई ॥ निंबराज बोधराज । माथा तयांचे पायीं ॥ कूर्मदास शिवदास ॥ मलुकदास कर्माबाई ॥ ४ ॥ नारा म्हादा गोंदा विठा । प्रेमळ दामाजी ॥ तुकोबा गणेशनाथ । सेना नरसीमहत ॥ तुलसीदास कसांबया । पवार संतोबा भक्त ॥ महिपती तुम्हांपासी । चरणसेवा मागत ॥ ५ ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

संत व ग्रंथ — आरत्या

१४ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.