जय जय नवनाथांचा

नवनाथांची आरती

देवता: नवनाथ

मूळ शब्द

जय जय नवनाथांचा । जय ज्ञानेशांचा । योगीजन नीरांजन । जय गर्जू गुरुंचा ॥ जय देवा जय देवा । जय जय नवनाथा । जय श्रीसांब सदाशिव । जय आज्ञा नाथा ॥ जय जय ॥१॥ जय श्रीदत्तानाथा । जय श्री रघुनाथा । जय नाथा मछिंद्रा । गुरु होसी इंद्रा ॥ जय जय ॥२॥ गोरक्षा तूं रक्षिसि । मोहातुनि गुरुसि । शिष्योत्तम तू होसी । जय तव श्रीनाथा ॥३॥ मीना मारुनि जीवें । जीवन त्या दिधले । गुरुतें सावध केलें । मोह मुक्त केलें । ऐसा महिमा भूवरी । आहे नाथांचा ॥४॥ मागू नाथापाशी । मुक्ति आम्हां द्यावी । जय नाथा, नवनाथा । आरती पुरवावी ॥५॥ जय जय नवनाथांचा । जय ज्ञानेशांचा । योगीजन निरांजन । जय गर्जू गुरुंचा ॥ जयदेवा ॥

पूजा बुक करायची आहे?

अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.

पूजा बुक करा

संत व ग्रंथ — आरत्या

१४ आरत्या
🙏

पुरोहितांचे प्रोफाइल पाहा

पुरोहितांचे संपूर्ण प्रोफाइल, माहिती, सेवा, फोटो, अभिप्राय व उपलब्धता पाहण्यासाठी व याच पुरोहितांची पूजा बुक करण्यासाठी मोफत खाते तयार करा किंवा लॉगिन करा.

VedPurohit ॲपपंचांग, आरती, पूजा बुकिंग व कुंडली — मोबाईलवर, इंटरनेटशिवायही. ॲप डाउनलोड करा

WhatsApp वर मदत

खाते न बनवताही विचारा — आमची टीम WhatsApp वर लवकर उत्तर देईल.

कशासाठी मदत हवी?

कोणती पूजा, कधी व कुठे — आम्ही योग्य पुरोहित व दक्षिणा कळवू.

संदेश असा जाईल
WhatsApp वर पाठवा

"पाठवा" दाबल्यावर हा संदेश WhatsApp मध्ये उघडेल; तिथे तुम्ही तो बदलू शकता.