आरती एकनाथा महाराजा समर्था
देवता: संत एकनाथ
मूळ शब्द
आरती एकनाथा । महाराजा समर्था ॥
त्रिभुवनीं तूंचि थोर । जगद्गुरु जगन्नाथा ॥ धृ॥
एकनाथ नाम सार । वेदशास्त्रांचें गूज ॥
संसारदुःख नास । महामंत्राचें बीज ॥ १॥
एकनाथ नाम घेतां । सुख वाटलें चित्ता ॥
अनंत गोपाळदासा । धणी न पुरे गातां ॥ २॥
पूजा बुक करायची आहे?
अनुभवी, पडताळणी केलेले पुरोहित संपूर्ण वैदिक विधीसह पूजा करतील.